ताज्याघडामोडी

तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणत सूनेला छळले, त्रास असह्य, महिलेने घेतला टोकाचा निर्णय

तुला सारख्या मुली होतात, तुला मुलगा होत नाही असे म्हणून त्रास देत असत. तसेच सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अश्विनी योगेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याबाबत संदेश जयसिंग काळकुटे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सासु मंदा ज्ञानदेव चौधरी, पती योगेश ज्ञानदेव चौधरी, सासरे ज्ञानदेव सोनबा चौधरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुरुवार दि.२० एप्रिल रोजी ही घटना घडली आहे.

याबाबत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यांची बहीण अश्वीनी योगेश चौधरी हिचे लग्न काही वर्षापूर्वी योगेश चौधरी याच्याशी झाले होते. लग्नानंतर अश्वीनीला तीन मुली झाल्या. लग्नानंतर अश्विनी हिला दोन वर्ष चांगले नांदवले. त्यानंतर तिला किरोकोळ कारणावरुन सासू, सासरे, नवरा हे मारहाण करत. तुला सारख्या मुलीचं होतात. असे टोमणे मारत असत. याबाबत बहिणीने मला अनेकदा फोनवर याबाबत माहिती दिली होती आणि अनेकदा समजूत काढून आम्ही अश्विनीला नंदायाला पाठवले.

शारीरक छळ करून मारहाण करत होते. त्या त्रासाचा अतिरेक सहन न झाल्याने अश्विनी हिने जवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेबाबत फिर्यादी यांचे दाजी योगेश चौधरी यांनी मला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आम्ही सर्वजण घटनास्थळी दाखल झालो तेव्हा अश्विनचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे. पहायला मिळाले. नंतर पोलिसांच्या मदतीने तो मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत अधिक तपास यवत पोलिस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago