ताज्याघडामोडी

शाळेतल्या शिक्षिकेसोबत अनैतिक संबंध, नंतर वारंवार पैशांची मागणी; शिक्षकाने एके दिवशी…

अनैतिक संबंधाला कंटाळून जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील गारव्हाण जिल्हा परिषदेत गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अनिल मोहन चव्हाण असं या शिक्षकाचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्या शिक्षकाने चिठ्ठी देखील लिहिली होती. शाळेतील महिला शिक्षकेकडून सुरु असलेल्या ब्लॅकमेलमुळे आत्महत्या करत असल्याचं त्या शिक्षकाने चिठ्ठीत लिहलं आहे.

मयत अनिल चव्हाण हे हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदमध्ये शिक्षक पदी कार्यरत होते. २०१४ साली त्यांची शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त झाली होती. सेवेदरम्यान त्या शिक्षकाचे शाळेतील एका महिला शिक्षिकेशी सूत जुळले. मात्र, काही वर्षानंतर त्यांच्यात कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद होत होता. यादरम्यान त्या सहशिक्षिकेने पैशांची मागणी करत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. दूसरीकडे पतीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण शिक्षकाच्या पत्नीला देखील लागली होती.

एकीकडे ब्लॅकमेल सुरु होतं आणि दूसरीकडे या प्रकरणाची घरी माहिती लागल्याने तो शिक्षक मानसिक तणावात होता. प्रकरण कसं मिटवावं? हे त्या शिक्षकाला समजत नव्हतं. अखेर परीक्षेचे पेपर तपासायचं आहे असं खोटं सांगून तो शिक्षक बुधवारी रात्री घरातून निघाला. शाळेत पोहोचल्यानंतर शाळेतील खोलीत गळफास घेऊन शिक्षकाने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शाळेत आलेल्या सेवकाला अनिल चव्हाण यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मनाठा पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी सुसाईड नोट देखील आढळून आली.

“सहशिक्षिका वारंवार पैशाची मागणी करत मला ब्लॅकमेल करत आहे. या ब्लॅकमेलला मी थकून गेलोय”. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करुण शवविच्छेदनासाठी मृतदेह हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनं एकच खळबल उडाली आहे. मयत अनिल चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. दरम्यान, चिठ्ठीत ज्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

18 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago