राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये हत्या, दरोडा, हत्येचा प्रयत्न, बलात्कार तसेच दहशत माजवण्याचा, तोडफोड यांसारख्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आता तर पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरच नाही तर थेट मॉलमध्ये देखील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.
पुण्यातील विमाननगर भागात असणाऱ्या फिनिक्स मॉलमधील स्टार बाजारमध्ये खरेदीस गेलेल्या तरुणीचा अश्लिलरित्या व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात एका २० वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर अमीर अश्फाक अहमद (वय ३२ रा. मयूर किलबिल सोसायटी, धानोरी) या इसमाला अटक केली आहे. त्याच्याविरोधात कलम ३५४ क नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी ही रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत फिनिक्स मॉल मधील स्टार बाजार याठिकाणी किराणा माल खरेदी करण्यासाठी गेली होती. पीडित तरुणी आणि तिचा मित्र दोघेही किराणा खरेदी करत होते. पण त्याच वेळी अमीर हा तरुणीच्या प्रायव्हेट पार्ट आणि शरीराच्या अवयवांकडे लैंगिक समाधान मिळण्याच्या हेतूने आणि पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल या उद्देशाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत असल्याचं आढळून आले. त्यानंतर तरुणीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करून घेतला आणि विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…