ताज्याघडामोडी

ATM ट्रांझेक्शन फेल झाल्यास आता भरावा लागेल दंड, ‘या’ बँकेने घेतला निर्णय

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांसाठी एक वाईट बातमी आहे. तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास आणि ATM मधून पैसे काढताना, खात्यात कमी बॅलेन्स असल्यामुळे ट्रांझेक्शन फेल होतो. अशा वेळी PNB तुमच्याकडून 10 रुपये+ GST ​​दंड आकारेल. हा नवा नियम 1 मे 2023 पासून लागू होणार आहे.पंजाब नॅशनल बँकेने आपल्या वेबसाइटवर नोटीस जारी करताना ही माहिती दिलीये. बँकेने आपल्या ग्राहकांना म्हटलेय की, प्रिय ग्राहकांनो, 1 मे 2023 पासून, अपुर्‍या निधीमुळे घरगुती एटीएम ट्रांझेक्शनमधून कॅश विथड्रॉल फेल झाल्यास 10 रुपये + GST चार्ज भरावे लागेल. पंजाब नॅशनल बँकेने एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास आकारण्यात येणार्‍या चार्जेसची माहिती देणारा एसएमएस ग्राहकांना पाठवण्यास सुरुवात केली आहे. हा मॅसेज बँकेच्या खातेदारांना सातत्याने पाठवला जात आहे.

तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक असली तरी, एटीएममधून व्यवहार अयशस्वी झालं तर काय? ग्राहकांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी पीएनबीने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ती आपण खाली जाणून घेऊया.ATM ट्रांझेक्शन फेल झाल्यास तक्रारीचे निवारण तक्रार मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत केले जाईल. ट्रांझेक्शनच्या 30 दिवसांच्या आत क्लेम केल्यास तक्रारीच्या विलंब निवारणासाठी रु. 100 प्रतिदिन दराने भरपाई दिली जाईल.

एटीएममध्ये व्यवहार अयशस्वी झाल्यास PNB ग्राहक 0120-2490000 किंवा टोल फ्री क्रमांक 1800180222 आणि 18001032222 वर ग्राहक संबंध केंद्राकडे तक्रार करू शकतात.पंजाब नॅशनल बँक देखील कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्वेक्षण करत आहे. पीएनबीच्या वेबसाइटला भेट देऊन, तुम्ही या सर्वेमध्ये सहभागी होऊ शकता आणि पीएनबीच्या सर्व्हिसेसविषयी तुमचे मत देऊ शकता. तसेच, तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या सेवांबाबत समाधानी आहात की नाही हे सांगू शकता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago