आई आणि अण्णा मला माफ करा… मी माझ्या अनसक्सेस आयुष्याला कंटाळलो आहे… माझ्या समोर जगण्याचं कोणतेच ध्येय राहिलं नाहीये… मी कोणत्या मुलीसाठी नाही, तर माझ्या अनसक्सेस लाईफला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आहे, अशी भावनिक चिठ्ठी लिहित एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. नांदेड जिल्हातील लोहा शहरात सोमवारी ही घटना उघडकीस आली आहे. प्रशांत पंढरी ढवळे असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
२३ वर्षीय प्रशांत ढवळे हा आपल्या कुटुंबियांच्या सोबत लोहा शहरातील इंदिरा नगर मध्ये राहत होता. एका खाजगी रुग्णालयात तो काम करायचा. बीएससीनंतर तो डीएमएलटीचं शिक्षण देखील घेत होता. काहीतरी करून दाखवायचं त्याचं स्वप्न होतं. त्यामुळे त्याने सातत्याने स्पर्धा परीक्षा दिल्या. पोलीस भरतीतही तो उतरला. मात्र नेहमी त्याला अपयश मिळत असल्याने तो हतलब झाला होता.
रविवारी मध्यरात्री तो आपल्या रूममध्ये गेला. आतून त्याने कडी लावली आणि त्यानंतर लोखंडी रॉडला दोरी बांधून त्याने गळफास घेतला. सकाळी उशिरापर्यंत दरवाजा बंद असल्याने कुटुंबियांनी दरवाजा ठोठावला. मात्र काही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर प्रशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांतने चिठ्ठी देखील लिहिली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…