एकतर्फी प्रेम करणाऱ्या मित्राला २५ वर्षीय मैत्रिणीने लग्नास नकार दिल्याच्या वादातून भररस्त्यात आरोपी मित्राने धारदार चाकूने गळ्यावर वार करून मैत्रिणीला ठार करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेकडील एका सोसायटी समोरील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात आरोपी मित्रावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. जिग्नेश मोरेश्वर जाधव, असं फरार झालेल्या आरोपी मित्राचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी २५ वर्षीय तरुणी ही डोंबिवली पूर्व भागात राहते. तर आरोपी मित्र जिग्नेश हा डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा भागात राहतो. दोघेही एकाच भागात राहत असल्याने दोघांमध्ये मैत्री होती. मात्र मैत्रीच्या आडुन आरोपी जिग्नेश हा पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्यातच १४ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित तरुणी ही एकटीच घरच्या दिशेनं पायी जात होती.
त्याच सुमाराला ती डोंबिवली पूर्वे कडील शांतीनगर भागातील वेद ओमशांती सोसायटी समोरील रस्त्यावर येताच, आरोपी जिग्नेशने तिला रस्त्यात थांबवून तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्या बरोबर ये, असं म्हटलं. मात्र, तिने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरोपी जिग्नेश याने त्याच्याकडे असलेल्या धारदार चाकूने पीडित तरुणीच्या गळयावर वार करून घटनास्थळावरून पळून गेला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत गंभीर जखमी अवस्थेत तरुणीला डोंबिवलीतील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी ठाण्यातील कळवा तेथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घटना १४ एप्रिल रोजी घडली असून आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. त्यामुळे अधिक माहिती देण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बाकले करीत आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…
पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…
सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…
पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…