एकाच कुटुंबातील ४ जणांची त्यांच्याच घरात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. धारदार शस्त्राने या चौघांची हत्या करण्यात आली असून हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मृतांमध्ये पती-पत्नी, एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. पुरावे गोळा करण्यासाठी श्वान आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
प्रकरण बांदाच्या गिरवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडोखर गावातील आहे. जिथे १५ मार्चच्या रात्री अज्ञातांनी एकाच कुटुंबातील चार जणांची धारदार शस्त्राने हत्या केली. मृतांमध्ये चुन्नू (७०), कैलसिया (६५), तीजानिया (७६) आणि प्रियांशू (८ वर्षे) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सर्वजण घरी होते त्याच दरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांना घटनास्थळी वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळून आले, त्यावरुन असा अंदाज बाधण्यात येत आहे की आरोपींना ज्या ठिकाणी जो सापडला त्याची तिथेच हत्या केली. रविवारी सकाळी घराचा दरवाजा उघडला असता शेजारच्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…