भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीतून तरुणावर वार करण्यात आल्याची घटना लोहगाव येथे घडली. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पसार झालेल्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. टोळक्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंतनू शिवराज चाटे (वय १९, रा. साई गणेश सोसायटी, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. दिलीप बाबुराव हांगे (रा. साई पार्क सोसायटी, आळंदी) पसार आहे. अमितकुमार विश्वकर्मा (वय २१, रा. लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
लोहगावमधील सार्वजनिक रस्त्यावरून अमितकुमार चालला असताना वडगांव-शिंदे रस्त्यावर चार-पाच जण भांडण करीत होते. अमितकुमार घाबरून पळून जात असताना शंतनू आणि इतरांना त्याने भांडण सोडविल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे टोळक्याने पाठलाग करून अमितकुमारवर वार करून त्याला गंभीर जखमी केले.
तरुणावर वार करणारे लोहगाव परिसरात थांबल्याची माहिती पोलिस अंमलदार स्वप्नील कांबळे आणि विनोद महाजन यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अमितकुमारने गाडी आडवी केल्याने त्याच्यावर वार केल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, संजय आढारी, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…