लग्नाचे आमिष दाखवून, तू माझी बायको होणार आहेस, असे म्हणत मागील अकरा वर्षापासून एका ३२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्यात आला आहे. महिलेच्या अंगावर डिझेल टाकून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील दहेगाव येथील एका आकड्यावर घडली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोन आरोपींविरोधात बामणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन विठ्ठल मस्के, बाबुराव लिंबाजी ढोणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेसोबत गजानन विठ्ठल मस्के यांची ११ वर्षांपूर्वी ओळख झाली होती या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर विठ्ठल मस्के यांनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, तू माझी बायको होणार आहेस, असे म्हणून महिलेवर अत्याचार केला. तसेच, महिलेला गोड बोलून महिलेच्या दुकानातील ९ लाख ५० हजार रुपये आणि सहा तोळे सोन्याचे दागिने खर्च करून महिलेची फसवणूक केली.
त्यानंतर आरोपी गजानन मस्के यांनी महिलेला छत्रपती संभाजीनगर येथून जिंतूर तालुक्यातील दहेगाव येथे बोलवले या ठिकाणी शेतातील एका पत्राच्या शेडमध्ये महिलेवर अत्याचार केला. नंतर महिलेसोबत मारहाण करण्यात आली. याचवेळी आरोपी गजानन मस्के यांचा मेहुना बाबुराव लिंबाजी ढोणे यांनी पीडित महिलेच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दे, असे म्हणून महिलेच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बामणी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी गजानन मस्के आणि बाबुराव ढोणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बामणी पोलिसांनी आरोपी गजानन मस्के याला ताब्यात घेतले आहे. त्याला जिंतूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट करीत आहेत. घटनेतील दुसरा अद्यापही फरार असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…