विवाहित प्रियकराने आधी प्रेयसीवर गोळी झाडली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून मृत्यूला कवटाळले. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या दोघांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलीस याप्रकरणी कारवाई करत आहेत.
प्रकरण उत्तर प्रदेशातील हलियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील रामपूर बाबुवान गावातील आहे. याच गावात राहणाऱ्या नागेंद्र प्रजापतीचे त्याच गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते. इतकंच नाही तर प्रियकर नागेंद्र हा दोन मुलांचा बाप होता. पण, प्रेयसीचे लग्न झालेले नव्हते. दोन्ही कुटुंबीयांना हे नातं मान्य नसल्याने प्रियकराने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच एसपी सुलतानपूर सोमेन बर्मा यांच्यासह सर्व पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मृतदेह पोलिसांच्या पथकाने शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे, पोलिसांचे म्हणणे आहे की, दोन मुलांचा वडील असलेली ही व्यक्ती एका मुलीच्या प्रेमात पडली होते, परंतु सामाजिक अडथळ्यांमुळे या दोघांच्या नात्यात अडथळा येत होता.
तितक्यात प्रेयसीचं दुसऱ्या कुणासोबत अफेअर असल्याचं समजताच हा विवाहित प्रियकर संतापला. आता या जन्मात तर प्रेयसी आपली होणार नाही, असं समजून त्याने तिलाच संपवलं. पुढच्या जन्मात भेटू या आशेने या विवाहित प्रियकराने आधी प्रेयसीला गोळ्या झाडून तिची हत्या केली, मग स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…