यंदा राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह इतरही भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. अशातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमधील गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ ते कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेली द्रोणीय स्थिती आणि राजस्थानच्या नैऋत्येकडे निर्माण झालेली चक्रीय वातस्थितीच्या परिणामाने पावसाळी स्थितीपासून राज्याला तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता लांबली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…