निमगाव केतकी येथे यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबाचा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत अपघात झाला. कारला झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात मुलांचे आई, वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे निमगाव केतकी (ता. इंदापूर) परिसरात शोककळा पसरली आहे.
आर्यन संतोष भोसले (वय १२ वर्षे) आणि आयुष संतोष भोसले (वय ८ वर्षे) या दोन भावांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे वडील संतोष भोसले व आई अश्विनी संतोष भोसले यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निमगाव केतकीतील संतोष एकनाथ भोसले त्यांच्या कुटुंबासह पुण्यात नोकरीनिमित्त स्थायिक होते. निमगाव केतकी येथील केतकेश्वर महाराज यात्रेनिमित्त भोसले कुटुंबीय शनिवारी (१ एप्रिल) पुणे-सोलापूर महामार्गावरून कारने गावी निघाले होते. भोसले कुटुंबाच्या चारचाकीला महामार्गावर खडकीजवळ भीषण अपघात झाला. यात संतोष भोसले, त्यांची पत्नी आणि दोन मुलगे गंभीर जखमी झाले.
पुणे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आर्यनचा गुरुवारी तर आयुषचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष व अश्विनी भोसले हेदेखील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…