उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील तरुणाच्या हत्याकांडाचे गूढ उलगडत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने खुनासाठी वापरलेले पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. मित्राला आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असल्याच्या संशयातून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
पाच एप्रिल रोजी पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांचा तपास जसजसा पुढे जात होता, तसतशा धक्कादायक बाबी समोर येत होत्या.मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी मृताचे फोटो लावले होते. त्या आधारे मयत तरुण हा सागर राणा असल्याचे समोर आले. तो कर्नालचा रहिवासी होता.
लखनौमध्ये राहत असताना तो विजय सिंह याच्यासोबत प्रॉपर्टी डीलिंगचे काम करायचा. दरम्यानच्या काळात विजय सिंह सोबत सागरची चांगली गट्ट जमली. दोघेही एकमेकांच्या घरी जाऊ लागले. मात्र सागरला संधीचा फायदा घेऊन आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवायचे असल्याचा संशय विजयला पोखरु लागला.संशयाने बेजार झालेल्या विजयने आपल्या साथीदारासह एक प्लॅन आखला. आपल्या सफारी कारमधून तो शिवगड परिसरात गेला. तिथे त्याने सागरची गोळ्या झाडून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…