उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात सख्ख्या भाऊ-बहिणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे प्रकरण शाहगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिधाई भागातील आहे. येथे २७ वर्षीय राज कपूर आपल्या २० वर्षांच्या बहिणीसोबत राहत होता. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचेही मृतदेह एकाच खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.
नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचं गाभीर्य पाहता तात्काळ घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मृत भावंडांच्या नातेवाइकांनी सांगितले की, राज कपूर यांना काही काळापासून नीट चालता येत नव्हते. त्याला काही शारीरिक समस्या होती. त्याची बहीण पुष्पा त्याची काळजी घेत असत.
बुधवारी (१२ एप्रिल) सकाळी घरातून कोणीही बाहेर न आल्याने शेजारी राहणाऱ्या नातेवाइकांना संशय आला. तेव्हा त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर हे दोघंही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.
दोघांनी इतकं टोकाचं पाऊल का घेतलं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. तसेच, घटनास्थळावरुन कुठल्याही प्रकारची सुसाईड नोटही आढळून आलेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं. तरी पोलीस याप्रकरणी नातेवाइकांची चौकशी करत आहेत. पुढील कारवाई सुरु आहे. पण, एकाच खोलीत, एकाच वेळी भाऊ-बहिणीने एकत्र आयुष्याची अखेर केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…