पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची बिहारची असून ती शिक्षणासाठी ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात एका नातेवाईकाच्या कुटुंबासोबत राहत होती.१७ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन नातेवाईकानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी रविवारी तिच्याच नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने अलीकडेच तिच्या वडिलांकडे फोनवर तक्रार केली होती. संबंधित कुटुंबातील एका सदस्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. म्हणूनच ती त्यांच्यासोबत राहण्यास घाबरत होती आणि गावी घरी येऊ इच्छित होती, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पीडितेच्या वडिलांनी तुला परत येण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याचे सांगत आणखी काही दिवस तिला तिथेच थांबण्यास सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी मुलीच्या वडिलांना फोन आला की तुमच्या लेकीने आदल्या दिवशी संध्याकाळी घराच्या छताला गळफास लावून घेतला, असे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या संबंधित कलमां अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…