मथुरा येथील उच्च प्राथमिक शाळेत नियुक्त केलेल्या मुख्याध्यापकाला BSA ने निलंबित केलं आहे. मुख्याध्यापक करतार सिंह यांनी शाळेतील एका शिक्षिकेचा अनेकदा विनयभंग आणि चुकीचं वर्तन केल्याचा आरोप आहे.
शिक्षिकेने याला विरोध केला असता मुख्याध्यापकांनी तिला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. हे सर्व शिक्षिका बराच वेळ सहन करत राहिली होती.
शिक्षिकेने मात्र हा सर्व प्रकार रोज घडू लागल्यावर एबीएसएकडे तक्रार केली. हे प्रकरण राया ब्लॉकचे आहे. शिक्षिकेने सांगितले की, प्रिन्सिपल करतार सिंह तिच्यासोबत हे सर्व खूप दिवसांपासून करत होते. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सांगितले की, “मुख्याध्यापक माझ्या गळ्यात हात घालायचे. मग विद्यार्थ्यांना फोटो काढायला सांगायचे. घरी जातानाही मला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसायला सांगत असे.”
“मुख्याध्यापकांसोबत आणखी एक व्यक्तीही होती. त्याच्यासमोरही ते माझ्यासोबत अश्लील कृत्य करायचे.” शिक्षिकेने पुढे सांगितले की, तिने अनेकदा विरोध केला. त्यामुळे मुख्याध्यापक शाळेतून काढून टाकण्याची धमकी देत असत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…