ताज्याघडामोडी

पत्नीने आत्महत्या केल्याचे पतीने केले जाहीर, मात्र पोलीस चौकशीत धक्कादायक सत्य उघड

कौटुंबिक वादातून विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याची घटना पेठ बीड हद्दीतील युनूस पार्क परिसरात घडली. या प्रकरणात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव तिच्या पतीने केला होता. मात्र पेठ बीड पोलिसांनी केलेली चौकशी आणि मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमुळे आत्महत्येचा बनाव उघडा पडला.

मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पेठ बीड भागातील तेलगाव नाका येथील मुस्कान हिचा विवाह १५ महिन्यापूर्वी माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथील शेख शाहेद शेख रूकमोद्दीन ह्याच्यासोबत झाला होता. पात्रूड येथे राहत असतांना नेहमी वाद होत होता. त्यामुळे मुस्कानच्या वडिलांनी तिला बीडमध्ये आणले होते. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी जावई शेख शाहेद हा देखील बीडमध्ये आला.

मुस्कान आणि शाहेद दोघेही पेट बीड हद्दीतील युनूस पार्क येथे खोली भाड्याने घेऊन राहत होते. दिनांक ५ एप्रिल रोजी मुस्कान आणि तिच्या पतीमध्ये पात्रूड येथील सामान आणण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता शेख शाहेद याने मुस्कानच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलीची तब्येत बिघडली असून तोंडातून फेस येत असल्याचे सांगितले.

मुस्कानच्या वडिलांनी व तिच्या नातेवाईकांनी तात्काळ तेथे घाव घेतली असता मुस्कान गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुस्कानच्या देहावर, पायावर आणि हातावर जखमा आढळल्या असून तिच्या उजव्या गालाजवळ नख लागल्यासारखे दिसून आले. यावरून जावाई शेख शाहेद यानेच मुस्कानला ओढणीने गळा आवळून जिवे मारले व आत्महत्येचा बनाव केला याबाबत संशय बळावला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago