वाढत्या महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने गॅसच्या किमतींबाबत किरीट पारिख समितीच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजीसारख्या इंधनाच्या किमती कमी होऊ शकतात, असे मानले जात आहे.
देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या किमतीच्या नव्या सूत्राला मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यासोबतच सीएनजी आणि पाइप्ड स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींवर कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. ठाकूर यांनी माहिती दिली की मंत्रिमंडळाने एपीएम गॅससाठी $४ प्रति एमएमबीटीयू आधारभूत किंमत मंजूर केली असून कमाल किंमत $६.५ प्रति mmbtu ठेवण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…