तालुक्यातील वडली येथे एकाच कुटुंबातील तिघांनी एकाचवेळी विषारी औषध घेतल्याची धक्कादायक घटना घडली. आज सकाळी १० वाजता ही घटना घडली आहे. या घटनेत वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी आणि मुलाची प्रकृती गंभीर आहे. दोघांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. नारायण दंगल पाटील (वय ६६, रा. वडली ता. जळगाव) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर पत्नी भारती नारायण पाटील (वय ५५) आणि मुलगा गणेश नारायण पाटील (वय ३३) यांची प्रकृती चिंताजनक आहे.
जळगाव तालुक्यातील वडली गावात नारायण दंगल पाटील हे पत्नी भारती आणि मुलगा गणेश यांच्यासोबत वस्तव्याला होते. त्यांच्या दोन मुलींची लग्न झाली आहेत. तर एक मुलगा रोजगारानिमित्ताने दुसऱ्या गावी राहतो. आज सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान नारायण पाटील, त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील हे तिघी घरात असताना विषारी औषध प्यायले. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावात राहणारा मित्र श्यामला फोन करून घरी बोलावले. श्याम हा घरी गेल्यावर आई-वडिलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत दिसून आले.
श्यामने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने तिघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. उपचार सुरू असताना अवघ्या दोन तासांत तिघांपैकी नारायण पाटील यांचा उपचारादरम्यान सकाळी १० वाजता मृत्यू झाला. त्यांची पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…