क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याने संतापलेल्या बायकोने आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर मुसळाने वार करुन त्यास ठार केले. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात समविष्ट कोर्ला येथे मंगळवारी (ता. ४) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. शंकर लचमय्या दुर्गम (४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी सुशीला दुर्गम (३५) हिला पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवारी दुपारी शंकर दुर्गम व सुशीला दुर्गम यांच्यात पैशांवरुन वाद झाला. काही क्षणातच पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला. भांडणात संतापलेल्या सुशीलाने शंकरच्या डोक्यावर मुसळाने प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शंकर काही क्षणातच गतप्राण झाला. त्यानंतर शंकरचे वडील लचमय्या दुर्गम यांनी पातागुडम पोलिस मदत केंद्रात फिर्याद नोंदवली.
पातागुडम येथील पोलिस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार व असरअली येथील पोलिस उपनिरीक्षक तानाजी बहिरम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आज सुशीला दुर्गम हिला पोलिसांनी अटक केली. गुरुवारी तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…