स्वतःच्या शेतात गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज (४ एप्रिल रोजी) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. हे ठिकाण कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभिटोला येथे घडली. देवराम मानकू नैताम ( वय ५६ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
देवराम नैताम या शेतकरी बांधवाने पाच एकरात उन्हाळी धानपीक लागवड केली होती. धानाची रोवणी करून दीड महिन्याचा कालावधी लोटून गेल्यावरही धानपीक व्यवस्थित नसल्याने शेतकरी चिंतेत होता. सततच्या भारनियमनामुळे शेतीला पुरेसे पाणी मिळत नव्हतं. या परिस्थितीमुळे हिरव्यागार शेतात भेगा पडल्याने शेतकरी अस्वस्थ झाला होता. धानाला वेळेवर खतपाणी नसल्याचीही सतत खंत होती. त्यांनी ही व्यथा इतर शेतकरी बांधवांकडे सांगितल्याचे परिसरातील लोक सांगत आहेत.
देवराम नैताम या शेतकऱ्याच्या घरी तीन मुली आहेत. त्यांपैकी एक मुलगी लग्नाची आहे. इतर मुलामुलींचे शिक्षण, घरखर्च, शेतातून उत्पन्न होत नाही, अशा परिस्थितीत संसार कसा सांभाळायचा या विवंचनेत हा शेतकरी होता. विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने अखेर मुलाला तालुका मुख्यालयात कामानिमित्त पाठवले. त्यानंतर दुपारच्या वेळेस आसपास कोणी नसताना आपल्याच शेतात पडसाच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा आप्त परिवार असून या घटनेमुळे नैताम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…