प्रियकराने विवाहित प्रेयसीवर कटरने वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडातील सेक्टर ६३ कोतवाली भागातील छिजारसी कॉलनीमध्ये असलेल्या ओयोच्या लॉजमध्ये विवाहितेचा मृतदेह आढळला. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास महिलेची हत्या करून आरोपी हॉटेलमधून फरार झाला. बराच वेळ रुममधून कुठलाही प्रतिसाद न आल्याने कर्मचाऱ्याने दरवाजा तोडला. बाथरूममध्ये महिलेचा मृतदेह पाहून हॉटेल कर्मचाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी प्रियकर सोनूला अटक केली असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील इटावा येथील रहिवासी आहे.
विवाहित महिला आणि आरोपी दोघेही टेलरिंगचे काम करायचे. आरोपी प्रियकर सोनूचं लग्न ठरलं होतं. मात्र विवाहित प्रेयसीचा लग्नाला विरोध होता. या वादातून सोनूने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशातील इटावा येथील मूळ रहिवासी असलेले राजेंद्र बाबू हे पत्नी अनिता आणि दोन मुलांसह छिजारसी गावातील छोटपूर कॉलनीत भाड्याच्या घरात राहतात. मोठा मुलगा १८ वर्षांचा, तर धाकटा मुलगा १३ वर्षांचा आहे. आरोपी सोनू हा देखील इटावा येथील काठमऊ येथील रहिवासी आहे. बहलोलपूर गावात तो भाड्याच्या घरात राहत होता. राजेंद्रची पत्नी अनिता आणि सोनू यांची सुमारे तीन वर्षांपूर्वी गावातील एका लग्न समारंभात भेट झाली. यानंतर हळूहळू सोनू आणि अनिता एकमेकांशी बोलू लागले.
सोनूने राजेंद्र बाबूला त्याच्या कुटुंबासह नोएडातील छिजारसी गावात राहायला बोलावले. राजेंद्र बाबू ज्या कंपनीत टेलरिंगचे काम करायचे, तिथे सोनूला हेल्परची नोकरी मिळाली. सोनूने अनितालाही तिथे शिवणकाम करायला लावले. हळूहळू सोनू आणि अनिता एकमेकांच्या जवळ आले.
दोघांचे जवळपास गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. सोनू अनितापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. ३ मे रोजी तो लग्नाच्या बोहल्यावर चढणार होता. यावरुन त्याचा अनिताशी वाद झाला. दोघेही शुक्रवारी दुपारी ओयो हॉटेलमध्ये पोहोचले होते. तिथे लग्नाच्या मुद्द्यावरुन पुन्हा वाद झाला आणि आरोपीने अनितावर धागा कटरने वार करून तिची हत्या करून पलायन केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…