राजस्थानमधील जोधपूर येथे एका विवाहित महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. राजीव गांधी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी या महिलेचे पतीसोबत भांडण झाले आणि सायंकाळी उशिरा तिचा मृतदेह घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. राजीव गांधी नगर भागातील पठाणकोट भागात राहणाऱ्या महिलेचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आता ती संशयास्पद परिस्थितीत मृत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
सकाळी या पती-पत्नीमध्ये वाद झाला होता आणि सायंकाळी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या भांडणात पती जखमी झाला होता. त्यानंतर त्याने राजीव गांधी नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारही नोंदवली होती.
एसीपी प्रतापनगर प्रेम धांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं माहेर जयपूर येथे आहे. त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. माहेरहून नातेवाईक आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेने लव्ह मॅरेज केले होते. रविवारी रात्री या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरा मृतदेह मथुरादास माथूर रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…