बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथे एका मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. जवळच असलेल्या घाटपळशी ते पळशी फाटा पिंपळगाव काळे शिवारामधील हरिभाऊ दयाराम तायडे यांच्या वीट भट्टीवरील पिता-पुत्रांमध्ये घरगुती वादावरून शाब्दिक चकमक झाली. या वादाचे रूपांतर मारामारीत झालं. मुलगा भाऊ सिंग भैरड्या (वय ४०) याने त्याचे वडिल नानसिंग पहाडसिंग भैरड्या (वय ६०) यांच्या डोक्यात बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात अधिक चौकशी केली असता ही घटना रात्रीची असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती कामावर असलेल्या मयूर हरिभाऊ तायडे यांनी दिली. मृतक नानसिंग पहाडसिंग हा लोखंडी पलंगावर पडलेला असून काही हालचाल होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी मयूर हरिभाऊ तायडे यांनी जळगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली.
सदर घटना काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृत आणि त्याचा मुलगा दोघेही कडूपट्टा जळगाव परिसरातील आदिवासी असून ते वीट भट्टीवर मजुरीने काम करतात. या प्रकरणी आरोपी भाऊ सिंग भैरड्या याच्या विरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल झाला असून ठाणेदार दिनेश झांबरे यांनी गतिमान तपासचक्रे फिरवत दोन तासात आरोपीला अटक केली. दरम्यान, पुढील तपास सह पोलीस निरीक्षक कैलास चौधरी करत आहेत.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…