ताज्याघडामोडी

चंदन मध्यरात्री घराबाहेर पडला तो अखेरचा, सकाळी पडक्या घरात सापडला, दोरी दिसल्यानं गूढ वाढलं

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये दोरीने गळा आवळून १७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही थरारक घटना रविवारी सकाळी कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील गुलमोहरनगर येथे उघडकीस आली. या घटनेने पोलीस व रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. चंदन कन्हय्या लहरे,असे मृत मुलाचं नाव आहे. तो टाइल्स फिटिंगचे काम करायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनचे वडील कन्हय्या खासगी काम करतात. त्याला लहान भाऊ आहे. मध्यरात्री चंदन हा घराबाहेर निघाला. रविवारी सकाळी चंदन हा घराबाजूला असलेल्या पडक्या घरात बेशुद्ध अवस्थेत नागरिकाला दिसला.त्याच्या गळ्याभोवती दोरी होता. एखा नागरिकाने त्याच्या वडिलाला माहिती दिली. वडिलाने नागरिकांच्या मदतीने चंदनला घरात आणले.

दरम्यान, १७ वर्षीय मुलाचा खून झाल्याची माहिती कळमना पेालिसांना मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. चंदनचा खून करण्यात आला की त्याने आत्महत्या केली हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. तूर्त कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

3 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

4 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

1 month ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

1 month ago