ताज्याघडामोडी

एका कोंबडीमुळे १९ वर्षीय तरुणाचा जीव गेला, चोरांकडून कुऱ्हाडीचे घाव, तडफडत जीव सोडला

नवी मुंबई शहरामध्ये गुन्हेगारीचे क्षेत्र वाढत चालले आहे. नेरुळमध्ये बांधकाम व्यवसायिकाची हत्या त्यानंतर पनवेलमध्ये बांधकाम व्यवसायिकाच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेवर गोळीबार असे एक ना अनेक प्रकार सर्रासपणे घडत आहेत. त्यामुळे नवी मुंबई पनवेलमध्ये गुन्हेगारी क्षेत्राला आळा बसणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे. त्यातच आता जीभेचे चोचले पुरविण्याच्या नादात २९ मार्चला रात्रीच्या वेळी पनवेल शिवकर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये एका १९ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

२९ तारखेला रात्री दोन वाजताच्या सुमारास तीन जण आपल्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी विकत घेता येत नाही म्हणून कोंबडी चोरण्यासाठी शिवकर गावात शिरले. रात्रीच्या दोन वाजता हे तिघेजण गावाकडील बाहेर जाळ्यात ठेवल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या शोधात होते. त्या शोधात ते गावात राहणाऱ्या १९ वर्षीय विनय पाटील या तरुणाच्या घराजवळ गेले. घराच्या दरवाजाची कडी लावली नसल्याने चोरांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आत डोकावून बघितल्यावर त्यांची घरातल्या काही वस्तूंवर नजर पडली. त्या वस्तू त्यांनी चोरण्याचा प्रयत्न केला, असता झोपलेल्या १९ वर्षीय विनयला जाग आली. चोरांच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढला.

मात्र, विनयने उठून घरात घुसलेल्या चोरांचा कुऱ्हाड हाती घेऊन पाठलाग केला. गावाच्या बाहेर काही अंतरावर जाताच त्या तिघांसोबत त्याची झटापट झाली. अशात त्यांनी विनयवर त्याच कुऱ्हाडीने वार केले. यात विनय गंभीर जखमी होऊन खाली पडला. यानंतर चोरांनी तिथूनही पळ काढला.

काही वेळाने घरातील इतरांना गाढ झोपेतून जाग आली. विनय घरात न दिसल्याने त्यांनी विनयला शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना गंभीर जखमी अवस्थेत असलेला विनय सापडला. त्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी विनयला मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

ऐतिहासिक यमाई तलाव होणार प्रदूषणमुक्त !

​माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…

2 days ago

यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात

नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…

4 days ago

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर : प्रणव परिचारक

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न.

पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

4 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

5 days ago

भाजी मंडईतील विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत नगराध्यक्षा डॉ.प्राणिताताई भालकेयांची प्रत्यक्ष पाहणी.

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…

6 days ago