जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा येथे शुक्रवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईचं निधन झाल्यानं माहेरी आलेल्या लेकीनं आईच्या पार्थिवाजवळच प्राण सोडले. एकाच घरात एकाच दिवशी दोन जणांचं निधन झाल्यानं शेवाळकर आणि जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
जयमाला जाधव या त्यांच्या आई गयाबाई शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळताच माहेरी आल्या होत्या. आईच्या मृत्यूनंतर हंबरडा फोडत जयमाला जाधव यांनी आपले प्राण सोडले. जयमाला दिलीपराव जाधव या ५६ वर्षांच्या होत्या. जयमाला जाधव यांच्या आई गयाबाई किशनराव शेवाळकर यांचा शुक्रवारी वृद्धापकाळाने तामसा येथे निधन झाले होते. आईच्या निधनाची बातमी समजताच जयमाला जाधव या आईच्या अंत्यदर्शना साठी आपल्या माहेरी आल्या. माहेरी आल्यानंतर आईचे मृतदेह पाहताच मुलीला आश्रू अनावर झाले आणि मुलीने आईच्या पार्थिवावर हंबरडा फोडला.
आई आता माझे कसे होणार..मी आता कस जगू असं म्हणत जयमाला या गयाबाई यांच्या पार्थिवाजवळ चक्कर येऊन खाली पडल्या. जयमाला जाधव या बेशुद्ध झाल्याने त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारा पूर्वीच जयमाला यांनी प्राण सोडले होते.एकाच दिवशी घरात दोन मूत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या पार्थिवावर मुलीने प्राण सोडल्याच्या या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…