ताज्याघडामोडी

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिलासा; सिलिंडर दरात मोठी घट; पाहा नवे दर

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्याच दिवशी लोकांना दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेच बदल झालेले नाहीत. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात केंद्रानं घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली होती. या महिन्यात घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. पण व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. सरकारी गॅस कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर ९१.५० रुपयांपर्यंत कमी केले आहेत. त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक वापराचा सिलिंडर १ हजार ९८० रुपयांना मिळेल.

घरगुती वापराच्या सिलिंडरपेक्षा व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात अधिक बदल पाहायला मिळतात. राजधानी दिल्लीत आजपासून १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर २ हजार २८ रुपयांना मिळेल. याआधी सिलिंडरचा दर २ हजार २५३ रुपये होता. गेल्या वर्षभरात दिल्लीत सिलिंडरचे दर २२५ रुपयांनी कमी झाले आहेत. कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडरचा दर २ हजार १३२ रुपयांवर, तर चेन्नईत २ हजार १९२ रुपयांवर आला आहे.

सरकारी गॅस कंपन्या दर महिन्याला एलपीजीच्या दरात बदल करून नवे दर प्रसिद्ध करतात. मार्च महिन्याच्या प्रारंभी एलपीजी वापरकर्त्यांना धक्का बसला होता. कारण घरगुती वापरासाठीचा सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला होता. तर व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात तब्बल ३५० रुपयांनी वाढ झाली होती. मात्र यंदा घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ झालेली नाही. तर व्यावसायिक वापराचा सिलिंडर ९१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago