एका १७ वर्षीय पीडित मुलाला बाहण्याने लॉजवर नेऊन ४० वर्षीय नराधमाने पीडित मुलाला थंड पेयात गुंगीचे औषध देऊन अनैसगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड आली आहे. याप्रकरणी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नरधामावर पोक्सोसह अनैसगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. रितेश दुसाने असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.
धक्कादायक घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगा अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका भागात कुटुंबासह राहतो. तर आरोपी हा कल्याण पूर्वेतील पिसवली गावात राहतो. त्यातच २९ मार्च (बुधवारी) सकाळच्या सुमारास पीडित मुलगा घरानजीक असताना, नराधम आरोपी त्या ठिकाणी स्कुटी घेऊन आला होता. त्यावेळी पीडित मुलाला बहाण्याने स्कुटीवर बसून कल्याण पूर्वेतील एका लॉजवर घेऊन आला होता.
त्यानंतर लॉजच्या खोलीत पीडित मुलाला थंड द्रव्यात गुंगीचे औषध देऊन दोन वेळा अनैसगिक अत्याचार केला. शिवाय लैगिंक अत्याचार केले. या धक्कादायक घडललेल्या घटनेमुळे पीडित अल्पवयीन मुलगा भयभीत झाला असतानाच, नराधम आरोपीने त्याला घडललेल्या प्रकारची कुठे वाच्यता केल्यास, ठार मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलाने नरधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करत आपले घर गाठून त्यावर घडलेल्या प्रकार त्याने आईला सांगितला. हे ऐकून पीडित मुलाच्या आईला मोठा धक्काच बसला. त्यानंतर पीडित मुलाला घेऊन आईने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून नरधामावर भादंवि, कलम ३७७, ५०६, आणि पोक्सो कायदा कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला केला.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…