उत्तर प्रदेशच्या झाशीमधील चर्चेत असलेल्या पुष्पेंद्र यादव एन्काऊंटर प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची बातमी आज समोर आली आहे. २०१९ मध्ये एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या पुष्पेंद्र यादव यांची पत्नी शिवांगीनं आज गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना शिवांगीच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली. शिवांगीनं आत्महत्येसाठी स्वत:ला जबाबदार धरलं आहे.
जालौनच्या कालपी तहसीलमधील पिपराया गावात वास्तव्यास असलेल्या राकेश यादव यांची मुलगी शिवांगीचा विवाह झाशीच्या करमुखामध्ये राहणाऱ्या पुष्पेंद्र यादवशी २०१९ मध्ये झाला. लग्नाच्या काही महिन्यांतच झाशी जिल्ह्यात पुष्पेंद्र यादवचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या एन्काऊंटरमुळे पोलीस अडचणीत आले. पोलिसी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं.
पुष्पेंद्र यादव एन्काऊंटरचा तपास अद्याप सुरू आहे. या दरम्यान पुष्पेंद्रची पत्नी शिवांगीनं गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीयांनी तिला लटकलेल्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरवला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला.
मी माझ्या मर्जीनं आयुष्य संपवतेय. त्यात कोणालाही अडकवलं जाऊ नये, असं हाताच्या तळव्यावर लिहून शिवांगीनं आयुष्य संपवलं. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तळव्यावरील हस्ताक्षर पडताळून पाहिलं जात आहे. शिवांगीनं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल कोणतीच कल्पना नसल्याचं तिचे वडील राकेश यांनी सांगितलं.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…