ताज्याघडामोडी

गरिबांची सेवा हा उद्देश फार कमी डॉक्टरांचा-मा.आ प्रशांत परिचारक

 पंढरपुरात डॉ.रेश्मा करंडे यांच्या श्रीहरी नेत्रालयाचे उदघाटन

आजच्या काळात गरिबांची सेवा हा उद्देश फार कमी डॉक्टरांचा आहे,आजही अशा सेवाभावी हेतूने काम करणाऱ्या डॉक्टरांना मोठ्या आदराचे स्थान असल्याचे गौरवोदगार माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी काढले.गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कर्नल भोसले चौक येथे डॉ. रेश्मा करंडे यांचे श्रीहरी नेत्रालय या डोळ्यांच्या दवाखान्याचे उदघाटन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी भूषविले.  
डॉ. रेश्मा सुमीत करंडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पैसा मिळविणे हा
उद्देश नाही, केवळ गोरगरिबांची सेवा करणे हाच माझा उद्देश आहे. या उद्‌घाटन प्रसंगी
मोफत १०१ पेशंटची डोळे तपासणी व यातील ऑपरेशनसाठी असेलेल रूग्णांना ५०%
सवलतीच्या दरात ऑपरेशन करणार असल्याची माहिती दिली.  

या कार्यक्रमास मा. नगराध्यक्ष सुभाष भोसले, मा.नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,अर्बन बँकेचे चेअरमन सतीशजी मुळे,नगरसेवक शिवाजी कोळी,राष्ट्रवादी काँग्रेसचे 
शहर अध्यक्ष सुधीर भोसले,व्यापारी महासंघ अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर,
प्रसिद्ध उद्योजक दिपक भोसले, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. बोधले आदी मान्यवर उपस्थित होते.  

 

प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. मनोज भायगुडे,डॉ.आकाश रेपाळ यांनी डॉ. रेश्मा कारंडे यांच्या कामाचे  कौतुक केले.तर मा नगराध्यक्षा साधना भोसले म्हणाल्या कि, आमच्या परिसरात डोळ्यांचा दवाखाना नव्हता ही उणीव डॉ. रेश्मा कारंडे यांनी भरून काढली या बद्दल समाधान व्यक्त केले.    या प्रसंगी विवेक परदेशी, अँड. भारत वाघुले, गुप्ताशेठ, डॉ. शीतल फडे, डॉ. विवेक
गुंडेवार, डॉ. सौ. सुजाता गुंडेवार व शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्बन बँकेचे मा.चेअरमन रा.पा.कटेकर यांनी केले,तर
आभार कैलास करंडे यांनी मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago