नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. डोक्यावर कर्जाचं डोंगर आणि त्यातच आजाराने त्रस्त झालेल्या एका ३० वर्षीय महिलेने आपल्या १३ वर्षीय मुलाच्या डोळ्यादेखत विहरीत उडी मारून आत्महत्या केली. मीनाबाई पंजाबराव मेने (वय ३०) असं या महिलेचं नाव आहे. हदगांव तालुक्यातील चक्री गावातील रहिवासी असलेल्या मीनाबाई मेने ह्या मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होत्या.
त्यांच्या डोक्यावर कर्ज देखील होतं. आपल्याला आलेला आजार आणि त्यातच डोक्यावर कर्ज असल्याने त्या मानसिक तणावाखाली होत्या. रविवारी दुपारी मीनाबाई मेने आपल्या १३ वर्षाच्या शिवम नामक मुलाला सोबत घेऊन शेताकडे गेल्या. त्यानंतर मुलाला “झाडाखाली बस मी लगेच येते”, असं म्हणत पळ काढला. आई का पळते म्हणून मुलगा देखील तिच्या पाठीमागे पळू लागला. शेताच्या काही अंतरावर असलेल्या विहरीत जवळ त्या थांबल्या आणि आपल्या मुलाकडे पाहून त्यांनी विहरीत उडी मारली.
आपल्या आईला विहरीत बुडताना पाहून त्या चिमुकल्या मुलाने आरडाओरडा देखील केली. मात्र, तिथे कोणीच नसल्याने अखेर तो मुलगा धावत पळत गावात गेला आणि आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी पोहचले आणि पोलिसांच्या मदतीने त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मयत महिलेच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पती असा परिवार आहे. चिमुकल्या मुलांच्या टाहोने गावकऱ्यांचे हृदय हेलावून गेले होते. दरम्यान, या प्रकरणी हदगांव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेनं चक्री गावात शोककळा पसरली आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…