ताज्याघडामोडी

आईनेच ४ वर्षीय चिमुरडीला संपवलं; खळबळजनक घटना

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार आणि दरोडा असे अनेक प्रकारचे गुन्हे हे घडत असतात. त्याचदरम्यान, एक संतापजनक घटना शहरातील हडपसर येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकून भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घटना काल सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास हडपसर येथील सिद्विविनायक दुर्वांकूर सोसायटी ससाणे नगर येथे घडली आहे. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी आईला अटक केली आहे. दरम्यान, आरोपी आईने ही हत्या कोण्यात कारणातून केली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. वैष्णवी महेश वाडेर ( वय ४ वर्ष) असं हत्या झालेल्या या प्रकरणी तिची आई आई कल्पी हिला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. महिन्यापूर्वी ती तेथे राहण्यास आली होती. बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय आरोपी महिला करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती. त्यामुळे घरमालक तेथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता.

शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, तिने दरावाजा उघडला नाही. शेवटी घरमालक आणि शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago