अनेकदा काही व्यक्तींना लग्नानंतरही प्रेम होतं. त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. पण प्रेमाच्या नादात ते असं काही करून बसतात की त्यांना थेट तुरुंगात जाण्याची वेळ येते.
नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित महिलेचा पती प्रेमात अडसर ठरत असल्याने त्याने जो काही प्लॅन रचला तो सध्या नाशिकच्या ग्रामीण हद्दीत चर्चेचा विषय ठरला आहे. जायखेडा पोलिसांनी ही घटना उघडकीस आणलीय. सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील मोसम नदी काठावर एक मृतदेह असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली होती. मृतदेहाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर प्रचंड जखमा होत्या त्यावरून हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला होता.
जायखेडा पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने या घटनेचा तपास केला. त्यामध्ये मृतदेह हा लाडूद येथील दत्तात्रय ठाकरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामध्ये पोलिसांचा तपास सुरू असतांना पत्नीची कसून तपासणी करण्यात आली.
पत्नी माधुरी ठाकरे यांनी दिलेल्या माहिती पोलिसांना संशय आला होता. त्यामध्ये पोलिसांना तिचा प्रियकर असल्याची माहिती दिली होती. त्यामध्ये नंदुरबार येथील आसने गावातील भरत इलाचंद पाटील याच्याशी तिचे प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली.
प्रियकर याने दत्तात्रय ठाकरे यास दारू पंजून मोसम नदी काठावर घेऊन जात ठार मार होते. पोलिसांनी हा तपास अवघ्या आठ तासात करत गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी मयत ठाकरे याच्या पत्नीसह दोन प्रियकर आणि त्याचा साथीदार याला अटक केली आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…