ताज्याघडामोडी

सासूची हत्या, जखमी पत्नीची मृत्यूची झुंज, जावयाचा जीव देण्याचा प्रयत्न

जावयाने घरगुती वादातून भयंकर पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. आधी त्याने आपल्या सासूबाईंची हत्या केली, त्यानंतर पत्नीवर प्राणघातक हल्ला केला, अखेर स्वतःही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वाशिम शहरात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे.

वाशिम शहरातील बिलाल नगर परिसरात राहणाऱ्या एका जावायाने घरगुती वादातून आपल्या सासूची निर्घृण हत्या केली. ही घटना काल (गुरुवारी) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. अखेर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अब्दुल हाफीज अब्दुल सलाम (रा. बिलाल नगर, वाशिम) असं या आरोपी जावयाचं नाव आहे. या घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वाशिम शहरातील बिलाल नगर परिसरात राहणाऱ्या आरोपी अब्दुल हाफिज अब्दुल सलाम याचा आपल्या पत्नीसोबत अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. दरम्यान काल २३ मार्च रोजी वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने आपली सासू रुबीना बी यांच्या डोक्यावर फावडा मारला. त्यामध्ये त्या जागीच ठार झाल्या. तर पत्नी सबा परवीन हिच्यावर सुद्धा आरोपी पतीने जोरदार हल्ला चढवला. यामध्ये सबाही गंभीर जखमी झाली. तिला नातेवाईकांनी वाशिमच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र सबाची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला औरंगाबाद येथे पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago