मोठ्या भावाने धाकट्या भावाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार कोकणातून समोर आला आहे. आई बाबा धाकट्या मुलाचे अधिक लाड करतात, म्हणून चिडलेल्या मोठ्या भावाने खून केल्याचा आरोप आहे. छोट्या भावाच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याचं समोर आलं आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावातील चिरेखणवाडी येथे रात्री घडली.
या घटनेत स्टनी अंतोन डिसोझा (वय ३५ वर्ष, रा. कुंभवडे चिरेखनवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. घटनेनंतर कुंभवडे मधील अनेकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी आरोपी आयसीन अंतोन डिसोजा (वय ३७ वर्ष, कुंभवडे चिरेखनवाडी) याच्यावर कणकवली पोलिसात कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्टिन अंतोन डिसोजा (वय ६० वर्ष, कुंभवडे चिरेखनवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
घटनेतील मयत व आरोपी हे फिर्यादीचे मुलगे आहेत. आई वडील लहान मुलगा असलेल्या (मयत) स्टनी याचे जास्त लाड करतात, असा मोठ्या भावाचा समज होता. या रागातून आरोपी आयसीन अंतोन डिसोजा याने घरातील चाकू आपला भाऊ स्टनी याच्या पोटात खुपसून त्याला ठार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर स्टनी हा अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…