ज्या मित्राच्या घरी जेवला, त्याचीच हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अवघ्या काही दिवसात पोलिसांनी हत्येचा छडा लावत आरोपीला अटक केली. मोबाईलवरुन वाद झाल्यामुळे हत्या केल्याचा आरोप आहे.लाईनमनने आपल्या घरी जेवणासाठी मित्राला बोलावले, दोघांनी सोबत जेवण केले. दरम्यान मस्करी सुरु असताना लाईनमनने मित्राचा मोबाईल घेतला. तो देण्यास नकार देताच पाहुणा म्हणून आलेल्या मित्राने डोक्यात प्रहार करत लाईनमन मित्राला संपविल्याची धक्कादायक घटना गंगापूर शहरातील समतानगर भागात समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. योगेश माणिक भालेकर (वय ४५ वर्ष) असे मृत लाईनमनचे नाव आहे. तर नवनाथ खैरे असे हत्या झालेल्या आरोपी मित्राचे नाव आहे.या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, योगेश आणि नवनाथ हे दोघेही चांगले मित्र होते. १७ मार्च रोजी योगेशने नवनाथला घरी जेवणासाठी बोलावले होते. रात्री दोघांनी सोबत जेवण केले. दोघांनी सोबत गप्पा मारल्या. त्यानंतर योगेशने नवनाथचा मोबाईल घेतला.
बराच वेळ झाला तरी योगेश मोबाईल देत नव्हता. त्यामुळे नवनाथ संतापला व त्याने मागेपुढे न पाहता योगेशच्या डोक्यात दांड्याने प्रहार केला. एकच प्रहारात योगेश जमिनीवर कोसळला. ते पाहून नवनाथने घटनास्थळावरुन पोबारा केला. तेव्हापासून योगेशवर रुग्णालयात उपचार सुरु होते.उपचार सुरु असताना योगेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हानोंद करून पोलिसांनी फरार झालेल्या नवनाथ ला निफाड येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणच अधिक तपास गंगापूर पोलीस करित आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…