राज्याच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीच्या मागणीसाठी धमकी मिळाली आहे.नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आल्याची माहिती आहे. या बातमीनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा कॉल आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे धमकीचे कॉल आहे. मंगळवारी सकाळी दोन वेळा कार्यालयातील लँडलाईन क्रमांकावर हे कॉल आले.
या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली अशी माहिती आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने नागपूर पोलीसांना याबाबात माहिती दिली आहे. यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात आज सकाळी धमकीचे दोन फोन आले. या कॉलवरून गडकरींकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. हे कॉल जयेश पुजारी नावाने आले असल्याची तक्रार गडकरींच्या कार्यालयाने पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी गडकरी यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. या धमकीची वास्तविकता ते तपासत आहेत. हा केवळ खोडसरपणा की गंभीर बाब आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यापूर्वी देखील 14 जानेवारी रोजी बेळगाव तुरुंगातून गडकरी यांना कॉल आले होते, त्याच जयेश पुजारीच्या नावाने पुन्हा गडकरींना धमकी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…