अमरावती न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत एका प्राध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना अमरावतीतील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील वृंदावन कॉलनी येथे उघडकीस आली आहे. प्राध्यापकाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रा. डॉ. मनीष मोतीसिंह बैस (वय ५२ वर्ष) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले मनीष बैस हे प्रशांतनगर येथे पत्नीसह वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा मुंबई येथे शिक्षण घेत आहे. मनीष बैस यांचे वृंदावन कॉलनी येथेही घर आहे. अधूनमधून ते या घरी जात होते.
रविवारी सायंकाळी मुंबई येथील मुलाने त्यांना मोबाइलवर कॉल केले. मात्र, मनीष बैस यांनी कॉल उचलले नाहीत. त्यामुळे मुलाने आपल्या मित्राला वृंदावन कॉलनी येथील घरी जाऊन बघायला सांगितले. त्यानुसार मित्र वृंदावन कॉलनी येथील घरी गेला. यावेळी त्याला मनीष बैस हे पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले.
धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. मनीष बैस यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…