लालबाग हत्याकांडामध्ये आता आरोपी रिंपलने पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती दिली आहे. अखेर तिने आईची हत्या का केली? याचा खुलासा तिने पोलिसांसमोर केला आहे. आपल्या जन्मदात्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ५ तुकडे करणाऱ्या रिंपल जैनने मुंबई पोलिसांच्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. काहीही कारण नसताना आई वारंवार टोकायची. यामुळे ती अस्वस्थ झाली होती. अशात दुसरीकडे, तिच्या आईचा शिड्यांवरून खाली पडून मृत्यू झाला. तेव्हा आरोपाच्या भीतीने तिने आईच्या मृतदेहाचे ५ तुकडे केले, असं तिने पोलिसांना सांगितलं आहे.
दरम्यान, इमारतीतील एका रेस्टॉरंटमधील कर्मचार्यांपैकी एक, ज्याने रिंपल जैनला तिची आई वीणा कथितपणे पडल्यानंतर तिला त्यांच्या घरी घेऊन जाण्यास मदत केली होती. त्याने पोलिसांना या प्रकरणी धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितले की, त्यांनी तिला “आंटी (वीणा) श्वास घेत नाहीत” असे सांगितले होतं. यानंतर कर्मचाऱ्यांनी रिंपलला वीणाला डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलकडे घेऊन जायचं आहे का? असंही विचारले आणि तिला तिच्या नातेवाईकांना सांगण्यास सांगितलं. परंतु, तिने त्यांना हाकलून दिलं आणि मी मॅनेज करेन असं म्हणाली.
मुंबईतील लालबाग चाळीत राहणाऱ्या आरोपी रिंपलने पोलिसांच्या चौकशीत कबूल केले की, मृतदेहाचे तुकडे २ महिने घरात ठेवल्याने दुर्गंधी येऊ लागली होती. यामुळे ही दुर्गंधी दूर करण्यासाठी तिने चहाची पाने, फिनाईल आणि एअर फ्रेशनरच्या तब्बल ४० बाटल्यांचा वापर केला. ही बाब उघड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी आरोपी मुलगी रिंपल जैन हिला अटक केली.
याप्रकरणी अधिक चौकशीसाठी तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी मुलगी रिंपलने पोलीस चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मार्ग इंटरनेटवर शोधला आणि नंतर जवळच्या दुकानातून मार्बल कटर विकत घेतला.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…