ताज्याघडामोडी

शिक्षकाने विदयार्थीनीला तुला पुस्तके, पेन, कलर देतो म्हणत घरी नेले अन…

खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने क्लासमधील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची निंदनीय घटना शहरातील देवपूर भागात घडली. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.त्याला अटकही करण्यात आली. 

इयत्ता आठवीत शिकणारी १३ वर्षीय मुलगी संशयित परेश दत्तात्रय सोनवणे (वय ४९, रा. शिवाजी नगर, वाडीभोकर रोड, धुळे) याच्याकडे क्लाससाठी जायची. नेहमीप्रमाणे २ मार्चला सकाळी साडेआठच्या सुमारास ती शिकवणीसाठी गेली होती.

त्यावेळी संशयित परेश सोनवणे याने ‘तुला एमटीएसचे पुस्तके, पेन, कलर देतो’ असे म्हणून त्याच्या घरी नेले. विद्यार्थिनीशी अश्लील हावभाव करत तो स्वत: विवस्त्र झाला. शिवाय, मुलीला अश्लील चित्रण दाखविले. पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला.

त्यामुळे १५ दिवसांनंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत शिक्षकाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेनऊला संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक डी. एन. चव्हाण तपास करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

हॉस्टेलमधून पळाली, 4 जिल्हे भटकली, विद्यार्थिनीवर 4 ठिकाणी 4 जणांकडून अत्याचार, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…

4 hours ago

सर्व शासकीय विभागांनी आपले सरकार पोर्टल वरील तक्रारींचा वेळेत निपटारा करावा -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद *जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह

*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…

2 days ago

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाने मतदार संघातील रस्ते होणार चकाचक आ.अभिजीत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेत रस्त्यांसाठी निधीची मागणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…

4 days ago

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 45 हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त

सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…

5 days ago

‘भीमा’ कारखान्याचा प्रतिटन २७०० रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती  भीमा सहकारी साखर कारखान्याचा…

6 days ago

देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना; 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…

6 days ago