पोलिसांच्या नावाने तीन लाखाची मागणी करणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यात आणखी धक्कादायक म्हणजे तीन लाखाची मागणी करणारे हे दोघे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना आता सुरू झाल्या आहेत.
अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप (रा. सासवड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती समोर आली आहे. तक्रारदाराने सासवड पोलिसात अर्ज केला होता. त्या अर्जवरून सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोलप यांच्या नावाने तीन लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच या मागणीमध्ये गणेश जगतापने मदत केल्याचे समोर आले. यावरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
अटक केल्यांपैकी एकजण आमदार संजय जगताप यांचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संजय जगताप यांचा या घटनेशी काही संबंध तर नाही ना? अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. गणेश जगताप हा आमदार संजय जगताप यांचा चुलत भाऊ आहे. तसंच गणेश जगताप हा युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिवही आहे. याशिवाय अक्षय मारणे आणि गणेश जगताप हे आणखी काही राजकीय नेत्यांची कामे करत असल्याचे बोलले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक क्रांती पवार, पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद आयचीत यांनी केली आहे. या प्रकरणात राजकीय नेत्याचे नाव आल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. संजय जगताप यांचा नातेवाईक असल्याने राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे. तसेच ते दोघेजण अजून कुठल्या राजकीय नेत्यांची कामे करतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…