शेतामध्ये काम करत असताना अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील उखळी खुर्द गावामध्ये घडली असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात वीज पडून अजून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच दोन बैलाच्या अंगावर वीज पडून त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे दुपारच्या सुमारास मेघ गर्जनांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतामध्ये काम करत असलेल्या ओमकार भागवत शिंदे या १५ वर्षीय मुलाच्या अंगावर अचानक वीज कोसळली. घटना घडल्यानंतर ओमकारला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परभणी तालुक्यातील साडेगाव शिवारामध्ये अंगावर विज पडून बाबाजी केशव नाहातकर यांचा देखील मृत्यू झाला. तर द्वारकाबाई भागवत शिंदे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत.
परभणीमध्ये अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं असल्याने एकाच दिवसांमध्ये वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच सोनपेठ तालुक्यातील तडी पिंपळगाव येथे शेतामध्ये बांधलेल्या दोन बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने बैलांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी वीज पडून परभणी जिल्ह्यातील चार जण जखमी आणि चार जणांचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…