सोलार इंस्टॉलेशनच्या प्रकल्पासाठी तांत्रिक योग्यता (टेक्निकल फिजीबिलीटी) देण्यासाठी बावीस हजाराची लाच घेताना लातूरातील महावितरणच्या सहायक अभियंत्याला ॲन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. असून गोविंद तुकाराम सर्जे (वय 46 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. त्यांनी सोलार इंस्टॉलेशनच्या कामासाठी 22 हजारांची लाच मागीतली होती.
लातूरातील एकाचा सोलार इंस्टॉलेशनचा व्यावसाय असून त्यांनी हाती घेतलेल्या ग्राहकाच्या प्रोजेक्टकरिता टेक्निकल फिजीबिलीटी (तांत्रिक योग्यता) देण्यासाठी लातूरातील महावितरण कंपनीकडे अर्ज केला होता. लातूरातील महावितरणच्या शाखा क्र.05 चे सहायक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) गोविंद सर्जे यांनी कामासाठी व्यवसायिकास तीस हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ती रक्कम बावीस हजार देण्याचे ठरले होते. परंतू सदरील व्यवसायिकास लाच द्यायची नसल्याने त्याने ॲन्टी करप्शन विभागाकडे रितसर तक्रार दिली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ॲन्टी करप्शन विभागाच्या पथाकाने सापळा लावला. लाचेची मागणी केलेली रक्कम घेवून तो व्यवसायिक लोकसेवक यांना त्यांच्या महावितरणच्या कार्यालयात जावून भेटले. असिस्टंट इंजिनिअर गोविंद सर्जे यांनी मागितलेली लाचेची बावीस हजाराची रुपयाची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्विकारली. त्याच वेळी सापळा लावलेल्या ॲन्टी करप्शनच्या पथकाने आरोपी गोविंद सर्जे यांना अटक केली. लातूरच्या ॲन्टी करप्शन विभागाचे पोलीस उपाधिक्षक पंडित रेजितवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…