चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेऊन 9 वर्षाच्या चिमुकलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या 70 वर्षाच्या वृद्धाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्याच्या मुळशी तालुक्यात ही धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संतोष वाघू कंधारे असं बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
आरोपी हा एकाच गावातील असल्याने त्याची पीडित कुटुंबाशी ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत तो मुलीच्या शाळेत जायचा आणि तिच्या शिक्षिकेला तिच्याकडे काम आहे सांगून तिला स्वतःच्या घरी घेऊन घ्यायचा. मग तिच्यावर बलात्कार करायचा. याबाबत कुठे वाच्छता केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा.
मुलीच्या वडिलांना दारुचे व्यसन असल्याने तिची आई सात वर्षापूर्वी घर सोडून निघून गेली आहे. मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसह काका-काकू आणि आजोबांसोबत राहते. मंगळवारी मुलीच्या नात्यातील भावाच्या मोबाईलवर आरोपी मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडिओ आला. त्याने तो मुलीच्या आजोबांना दाखवला. व्हिडिओवरुन ही आपलीच नात असल्याची खात्री पटताच आजोबांनी मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारले असता मुलीने सर्व सांगितले.
महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…