पुण्यातल्या औंध परिसरात एका आयटीआय इंजिनीयरने आपल्या मुलासह पत्नीची हत्या करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पॉलिथिनची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. औंध येथील डीपी रोड परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. प्रियांका गांगुली (वय ४०), मुलगा तनिष्क गांगुली (वय ०८) आणि पती सुदीपतो गांगुली (वय ४४) असं या मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा भाऊ बँगलोरहून पुण्यात आला होता. सुरुवातीला घरातील सर्वजण बेपत्ता असल्याची तक्रार चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता सुदीपतोच्या मोबाईलचे लोकेशन घरातच आढळून आले. त्यानंतर घरी जाऊन तपास केल्यानंतर सगळे व्यक्ती मृत आढळले. घटनास्थळी पोलीस तपास करत असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चतुर्श्रुंगी पोलीस करत आहेत.
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये सोलापूर…