एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 52 वर्षीय शिक्षकाला वर्गातील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गोंदिया पोलिसांनी सोमवारी दिली आहे. तक्रारीच्या आधारे, कलम 354 (POCSO) कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील डांगोर्ली येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे. हा शिक्षक या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 11 मार्च रोजी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्या शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले आहे.
मुलींच्या तक्रारीनुसार, आरोपीने इयत्ता 5वीत शिकणाऱ्या आठ मुलींना काही अश्लील व्हिडिओ दाखवले होते. तसेच तो शिक्षक गेल्या महिन्यात मुलींना अयोग्यरित्या स्पर्शही करत होता. मुलींनी त्यांच्या पालकांना याबाबत माहिती दिली. लगेच पालकांनीही शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला व याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर याबाबत सोखल चौकशी झाल्यानंतर या शिक्षकाविरोधाक गुन्हा दाखल करत त्याला अखेर अटक केली आहे.
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…
11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…
पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…