आजीकडे पाहुणी म्हणून आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ४ जणांविरोधात बलात्कार व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात असून यात दोन महिलांचादेखील समावेश आहे.
यातील प्रकरणातील अल्पवयीन पीडिता ही तिच्या दूरच्या आजीच्या घरी पाहुणपणी आली होती. दरम्यान, ६ मार्च रोजी दुपारी १२ च्या सुमारास ३५ व ५५ वर्षीय महिलांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली. त्याच महिलांनी कृकर्मा आरोपी अनिल व विक्कीला घराच्या आत सोडले आणि त्या घराचे दार बंद करून बाहेर निघून गेल्या. त्या अर्धा तासादरम्यान दोन्ही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. काही वेळाने मोठ्या हुशारीने ती तेथून बाहेर पडली. वाच्यता केल्यास जिवानिशी मारण्याची धमकी मिळाल्याने ती भयभीत झाली होती.
दरम्यान, ती बहिणीकडे गेली. तेथे तिने बहीण आणि आत्याला आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनी धीर दिल्यानंतर तिने रात्रीच पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार प्रशांत गीते यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला अंमलदाराकडून तिचे बयाण नोंदवून घेतले. चारही आरोपींना तातडीने अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीला त्या दोन नराधमांच्या तावडीत देऊन दोन आप्त महिला दार बाहेरून बंद करून निघून गेल्या होत्या.
हा प्रकार आठवड्यानंतर उघड झालेल्या या गेल्या. घटनेप्रकरणी शिरजगाव कसबा पोलिसांनी याच ठाण्याच्या हद्दीतील आरोपी अनिल (२०) व विकास (२५) या दोघांसह दोन महिलांनादेखील तातडीने अटक केली. सोमवारी दुपारी त्यांना न्यायालयासमक्ष उपस्थित करण्यात आले होते न्यायालयाने अनिल व विकासला दोन दिवसांचा पीसीआर तर महिलांना एमसीआर सुनावला असल्याची माहिती ठाणेदार गीते यांनी दिली.
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये सोलापूर…