केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटले आहे. यामुळे उद्धव ठाकरे नव्याने शिवसेना उभारण्यासाठी तयारी लागले आहेत. अशातच शिंदे गट उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि सर्वात जुने निकटवर्तीय माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
यापूर्वी शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे सुभाष देसाईंच्या घरात उभी फूट पडली आहे. देसाई अत्यंत निकटवर्तीय असल्यानं ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भूषण देसाई यांचा पक्ष प्रवेश झाला.
यापूर्वी देखील शिवसेनेच्या अनेक निष्ठावंत नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर देखील शिंदे गटात सामील झाले होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कायमचा जय महाराष्ट्र करून गजानन कीर्तिकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. कीर्तिकर यांचा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश होता.
कीर्तिकरांच्या बंडामुळं राष्ट्रीय कार्यकारिणीतही फूट पडली. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे ते अध्यक्ष होते. यानंतर आता उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि सर्वात जुने निकटवर्तीय माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई शिंदे गटात प्रवेश केला आहे. यापूर्वी अनेक आमदार, नगरसेवकांसह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये सोलापूर…