मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका पोलीस उपनिरीक्षकाने पत्नी आणि मुलाची हत्या करुन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. पोलिसांना घटनास्थळावरुन कुठलीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे या पोलिसाने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं हे गूढ सध्या पुढे आलेलं नाही. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक सुरेश तायडे यांनी पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
मिसरोद परिसरात एसबीचे उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश तायडे यांनी चालत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. यापूर्वी त्यांनी कोलार येथीळ घरात पत्नी आणि मुलाचा गळा चिरून खून केला होता. कोलार येथील ललिता नगर येथून पोलिसांनी पत्नी आणि मुलाचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सध्या पोलीस या उपनिरीक्षकाने हे पाऊल का उचलले याबाबत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…
सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…
गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू,शेतकरी आणि कारखान्याची ऊस तोंडणी यंत्राला पसंती भीमा सहकारी साखर कारखान्याचा…
सोलापूर दिनांक 19 :- गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये सोलापूर…